शेगाव येथे शेतकऱ्यांना कृषी तंत्र विषयी मार्गदर्शन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.28 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव बू येथे आज एलन पंप मशनरी कंपनी तर्फे अभिषेक कृषी सेवा केंद्र शेगाव येथे शेतकऱ्यांच्या फायद्याकरिया शेतकऱ्यांना कमी पैष्यामध्ये तसेच कमी विद्युत पुरवठा मध्ये कोणते यंत्र लाभदायक राहील तसेच कमी वेळा मध्ये सर्वात जस्त अधिक लाभ कसा घेता येईल यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून सुरेशकुमार कोयामतुर तामिळनाडू मुख्य अधिकारी , पुरुषोत्तम हिंगणकर , सदिष लाडुकर सर्व्हिस इंजिनियर , प्रणामफुले इत्यादी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते . यामध्ये शेतीची गुणवत्ता कशी वाढविता येईल विजेचे बिल कमी कशे करता येईल , अश्या अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री कंनैयालाल जयस्वाल , तसेच हर्षल बोअरवेल चे संचालक श्री नीळकंठ महाकुलकर तसेच अन्य शेतकऱ्याचा सत्कर करण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम नीळकंठ महाकुलकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.