महात्मा फुले तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर तर्फे२६ नोव्हेंबर संविधान सन्मान दिन संविधान जागृती सप्ताह सावरी (बिड) संपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 नोव्हेंबर) :- २६ नोव्हेंबर संविधान सन्मान दिन संविधान जागृती सप्ताह ग्रामीण विभाग द्वारा आज दिनांक २२/११/२०२३ ला सायंकाळी ५.०० वाजता नालंदा बौद्ध विहार सावरी (बिड) येथे संपन्न मा.लोकनाथ जी रामटेके सरपंच गट ग्रा.सावरी(बिड)यांचे अध्यक्ष ते खाली संविधान सन्मान दिन जागृती सोहळा पार पडला.

याप्रसंगी मा.रमेश जी रामटेके, फुलझेले सर,खोब्रागडे साहेब,आयुष्यमान टिपले साहेब महात्मा फुले संवर्धन समिती पदाधिकारी व सावरी वासीय ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी शेन्डे यांनी केले तरी आभार प्रदर्शन प्रसिक खोब्रागडे यांनी केले.