युवा सेनेच्या प्रयत्नांना यश : नागलोन गावाला बस थांबणार Success to Yuva Sena’s efforts: Bus will stop at Naglon village

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.24 ऑगस्ट) :- तालुक्यातील नागलोन गावाला राज्य परिवहन मंडळाच्या बसचा थांबा मंजूर असतांना सुध्दा या ठिकाणी बस थांबत नव्हती. यामुळे नागलोन ग्रामस्थ आणि येथील विद्यार्थांची फार मोठी गैरसोय झाली होती. परंतु युवा सेनेच्या प्रयत्नांने अखेर आगार व्यवस्थापकांनी  नागलोन थांब्यावर बस थांबविण्यात यावी. असा नोटीस तात्काळ जारी करून बसचालक व वाहकांना सुचना दिल्या.

     तालुक्यातील वरोरा – वणी महामार्गावर  कुचना गावासमोर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नागलोन या गावी थांबा असून सुद्धा तेथे एकही बस थांबवल्या जात नव्हती. नागलोनच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी बसचालक व वाहकाला सांगून सुध्दा येथे  बस थांबविल्या जात नव्हती.

यामुळे ग्रामस्थ  व शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या  शिवालय  मध्यवर्ती कार्यालय येथे भेट देऊन  त्यांच्या समस्या सांगितल्या.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा – भद्रावती विधानसभा  प्रमुख रविंद्र शिंदे व तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिक निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक यांना मागणीचे  निवेदन देण्यात आले.

आगार व्यवस्थापकांनी तात्काळ नोटीस जारी करून बस चालक व वाहकांना नागलोन या गावी बस सेवा सुरळीत करण्याचे आदेश दिले.या प्रसंगी युवा सैनिक चेतन ढवस, सौरभ उरकुडे, सौरभ चिंचोलकर, आदित्य मडावी, चेतन बावणे, अनुप पावडे व नागलोन येथील कार्यकर्ते उपस्थित होते.