क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला

🔹पारस जेन्टस पार्लर यांच्या सलून दुकानमध्ये साजरी करण्यात आली

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.28 नोव्हेंबर) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 28 नोव्हेंबर ला 133 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.

पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहिली आहे यावेळी शेगांव बू येथील सूपरिचित असलेले नाभिक सामाजिक कार्यकर्ते श्री धनराज भाऊ घुमे यांच्या हेअर सलुन दुकानामध्ये साजरी करणा़यात आली .

यावेळी शिवसेना शिवसेना उपविभाग प्रमुख होमराज घुमे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तालुका अध्यक्ष आदरणीय श्री.त्रिशूलभाऊ बोंन्दगुलवार तसेच जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य असलेले आदरणीय श्री.उमेशभाऊ माकोडे माळी समाजाचे नेतृत्व करणारे आणि अध्यक्ष असलेले श्री.सचिन फुलकर,निष्ठावंत शिवसैनिक श्री नाना जगताप तसेच वरोरा तालुका संघटक श्री.सचिन रासेकर,मानव अधिकार संघ संयोजक तालुका वरोरा कमलाकर कापटे किसनजी पाडेवार गोविंदा ऊईके शुभम साहारे प्रकाश खांदारे,प्रकाश सोनार्थी,अनिकेत आंबुलकर व राजू बोकडे समिर पढाल इत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते.