रमाई घरकुल, शबरी घरकुल,प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्या

🔸प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️ चिमूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.11 फेब्रुवारी) :- तालुक्यातील पूर्ण गावांमध्ये एकच समस्या आहे जागा? जागा असून सूध्दा संबंधित सचिव व ग्रामपंचायत यांनी रमाई घरकुल योजने,शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.परतु लाभार्थ्यांच्या ताब्यात जागा असून सुद्धा ग्रामपंचायत रेकाॅडला गाव नमुना रेकाॅड ला नोंद असून सुद्धा लाभार्थ्यांना त्रास देत आहेत.

शासनाचे सक्त आदेश आहेत की जो लाभार्थी योजनेमध्ये पात्र झाला त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध करून द्या असे असताना सुद्धा अनेकांचे घरकुल जागा असून परत जाताना दिसत आहे. परंतु संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारच लक्ष देत नाही अशा अधिकार्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावे अशी मागणी विनोद उमरे यांनी केली आहेत. रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना या तिन्ही योजनेचे लाभार्थी ग्रामपंचायत कडे चकरा मारुन मारुन त्रस्त झाले आहेत.

अनेक लाभार्थ्यांचे घरकुल येऊन दोन ते तिन वर्ष झाले आहे. घरकुल परत जानेच्या मार्गावर आहे.स्थानिक पातळीवर राजकारण होत आहे . लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी एक समिती गठीत करुन यांच्या समस्या तात्काळ सोडून या घरकुलांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.