९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे नरेंद्र कन्नाके यांचा सन्मान 

197

✒️चंद्रपूर( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.7 फेब्रुवारी) :- ३,४ व ५ फेब्रुवारी २०२३ ला ९६ वे साहित्य संमेलन संपन्न झाले. यामधे कवी कट्टा, गजल कट्टा,परी संवाद,प्रकट मुलाखत, बाल साहित्य संमेलन, चित्र प्रदर्शन,पुस्तक विक्री अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार करून साहित्य संमेलन आयोजित केले होते. कवी कट्टा साठी आधीच कविता मागिविल्या होत्या.

कवी कट्टा साठी एकूण 523 कवींची निवड केली. त्यामधे नीरजा काव्य प्रकारातील ‘ माणूस माझे नाव ‘ या नीरजा रचनेची निवड करून 5 फेब्रुवारी ला 4 थ्या सत्रा मधे नरेन्द्र गुरुदास कन्नाके (नीरजाकार) ,गणेश नगरी, बोर्डा,आनंदवन,वरोरा यांना कविता सादरीकरण नंतर सन्मान चिन्ह, सन्मान पत्र मा. राजन लाखे व इतर मान्यवर मंडळी च्या उपस्थित सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले. या आधी ९२ वे, ९४ वे साहित्य संमेलन मधे सन्मानित करण्यात आले होते. नरेन्द्र कन्नाके हे साहित्य बरोबर शैक्षणिक, सामाजिक,क्रीडा क्षेत्रात अविरत काम करीत असून आनंदवन येथे बुद्धिबळ खेळाचे धडे गिरवत आहे.

नीरजा समूह म.राज्य या समूहाचे मुख्य प्रशासक असून आता पर्यंत 4 साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे. साहित्य संमेलन वर्धा येथे सन्मानित केल्या बद्दल मोठे भाऊ डॉ. हेमचंद कन्नाके(जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर), मुलगी नीरजा व जान्हवी कन्नाके संपूर्ण कन्नाके परीवार व नीरजा समूहा तर्फे पुढील वाचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.