कामगाराचे वेतन तात्काळ देण्यासाठी प्रहार सेवकांनी उचलली कंपनीची चारचाकी The Prahar Sevaks lifted the company’s four-wheeler to pay the worker’s wages immediately

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव बू येथून जवळच असलेल्या एस आर के कत्रक्षन कंपनी च्या कामगाराचे वेतन पगार गेल्या तीन महिन्यांपासून न झाल्याने येथील मजूर कामगारवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अनेक कामगार आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरत आहे .. 

       तेव्हा दुःखी पीडित मजूर कामगारांनी येथील बेधडक कामगिरी करणारे प्रहार सेवक श्री शेरखान पठाण यांची प्रत्यक्ष भेट घेत घडलेली सर्व आपबिती सांगितली तेव्हा संताप दर्शवून गोर गरीब मोल मजुरी करणाऱ्या कामगाराचा प्रश्न लक्षात घेऊन आज भेंडळा येथील एस आर के कांट्रक्षण कंपनी समोर मजुरा समक्ष्य बंड पुकारून येथील कामगाराचे वेतन आता च्या आता द्या . असा नारा दिला तेव्हा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी श्री लक्षण रेड्डी यांनी कंपनी कडे पैसे नाहीत असे सांगितले तेव्हा संतापाने भडकून मजुराच्या समक्ष प्रहार सेवक श्री शेरखान पठाण यांनी तुमची चारचाकी आमच्या स्वाधीन करा असे खडसावले . तेव्हा संतापाची लाट बघता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चारचाकी ची चावी शेरखान पठाण यांच्या स्वाधीन केली . जो पर्यंत येथील गोर गरीब मजुराचे वेतन पगार मिळणार नाही तो पर्यंत तुमची कंपनीची चारचाकी तुम्हाला मिळणार नाही असे सांगून चारचाकी जप्त केली .

गेले सहा ते सात वर्ष लोटून देखील वरोरा शेगाव चिमूर नॅशनल महामार्ग चे काम अर्धवटच आहे शिवाय यांच्या अनेक हलगर्जी पणामुळे अनेक नागरिकांना मोठा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. असे असताना देखील लोकप्रतिनिधी , संबधित विभाग , जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन यांना पाठबळ करतात असा आरोप देखील प्रहार सेवक शेरखान पठाण यांनी केला आहे .

गोर गरीब जनतेची पिळवणूक मी कदापिही खपून घेणार नाही यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यांच्या न्यायासाठी मी सदैव प्रयत्न शील राहील . येथील गोर गरीब मजूर कामगाराचे वेतन तात्काळ द्या अन्यथा तुमच्या वाहनाची भंगारात विक्री करून आम्ही घामाचे पैसे वसूल करू अशी धमक कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली…