मनपा निवडणूक साठी आप सज्ज 

🔹आप महानगर मध्ये अनेकांनी केला पक्ष प्रवेश

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.29 एप्रिल) :- दिनांक 28/04/2024 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर मध्ये पक्ष प्रवेश चा कार्यक्रम सुनील सदभैय्या यांचा घरी घेण्यात आला .येणारी महानगर पालिका निवडणूक लक्षात घेता आम आदमी पक्षात पक्ष प्रवेश करण्यास अनेक कार्यकर्ते उत्सुक दिसत आहे. काही इतर पक्षातले नाराज कार्यकर्ते तर काही सामाजिक कार्यकर्ते आप मध्ये आप ची विचारसरणी लक्षात घेता शमिल होऊ पहात आहे. 

                  आज अनेक महिलांनी व पुरुषांनी पक्ष प्रवेश करीत भाजप करीत असलेल्या हिंदू मुस्लिम मधील फूटी चा विरोध दर्शवला आहे. अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद सययद यांनी सविधानाचे अधिकार सांगत मूलभूत सुविधे बद्दल माहिती दिले. येणारी महानगर पालिका मध्ये आप ताकदीनिशी उभी रहाणार असे सांगितले. 

महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांचा अध्यक्षतेखाली महिला अध्यक्ष तबबसुम शेख यांनी माया दणवे , रमणा ताई , शिला भगत, कल्याणी पाल , तबससुम दीदी, यांचे पक्ष प्रवेश केले तर जावेद सययद यांनी अजय बुरबंदे, सुभाष कानपललीवार , यांचे पक्ष प्रवेश केले. माजी सैनिक तथा उपाध्यक्ष सुनील सदभैय्या यांनी देविदास काका, हर्ष सदभैय्या , सुमित मनमोडे आदींचे टोपी लाऊन सन्मानपूर्वक पक्ष प्रवेश करण्यात आले.

सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम मध्ये महानगर संघटन मंत्री सिकंदर सागोरे,, महानगर सचिव सुधीर पाटील, जितनदर भाटिया, सुजाता देठे, तृप्ती पाटील, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.