वरोरा तालुक्यात चारगाव येथे शिवसेना( उद्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या शाखेचे उदघाटन  Inauguration of Shiv Sena (Uddav Balasaheb Thackeray) Party Branch at Chargaon in warora Taluka

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.14 जून) :- वरोरा तालुक्यात चारगाव येथे जय भवानी जय शिवाजी घोषणा करत रॅली काढून पूर्ण जल्लोष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन, उदघाटक म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते व युवासेना तालुका प्रमुख वरोरा ओंकार लोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना शाखेचे उदघाट्न करण्यात आले.

त्यावेळी प्रमुख उपस्थिती युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, शिवसेना उपतालुका प्रमुख राजु राऊत, जेष्ठ शिवसैनिक अतुल नांदे शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवासेना विभाग प्रमुख रवी वाटकर, विभाग प्रमुख दिलीप बोधाने, उपविभाग प्रमुख कुणाल बुऱ्हाण, कपिल धकाते, रोशन नन्नावरे, निखिल कुडमेथे,समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक,उपस्थित होते.

त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारासाठी बेरोजगार संपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्यावेळी मुकेश जिवतोडे यांनी अशे बेरोजगाना सूचित केले कुणी सुशिक्षित बेरोजगार असेल त्यांनी शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे आपले कागदपत्रे सादर करावे.

 तसेच शिवसेना ( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) यांच्या माध्यमातुन सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करील अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी जनतेला केले.