आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने मजरा (खु), निमसळा येथील शेतकऱ्यांना मिळाली पिकांची नुकसान भरपाई

123

🔸परिसरातील शेतकरी आनंदात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे मानले आभार

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.7 ऑक्टोबर) :- तालुक्यातील मजरा (खु), निमसळा येथील शेतकऱ्यांना बी ई इस्पात (स्टिल प्लांट) कंपनीकडून पिक नुकसान भरपाई मिळाली असून ऐन शेतीच्या हंगामात हाती पैसा आल्याने शेतकरी आनंदात आहेत तर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून दिल्यामुळे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सर्व शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

    मजरा खुर्द येथे बि इ इस्पात कंपनीचे स्टिल प्लांट असून या कंपनीतून निघत असलेल्या धुरामुळे परिसरातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा कंपनीचे दार ठोठावले परंतु कंपनी पाहिजे तसा शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नव्हती . शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काही मिळत नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकरी पिकाचे नुकसान होउनही पीक नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्रस्त झाले होते.

कंपनी परीसरात मजरा लहान व निमसळा येथील शेतकऱ्यांचे शेती असून हाती आलेले पीक कंपनीच्या धुरामुळे बरबाद होताना शेतकरी उघड्या डोळ्यांनी बघत होता परंतु हतबल असलेल्या शेतकरी कंपनीकडे शेतीत नुकसान भरपाईची मागणी करत असताना कंपनीचे अधिकारी शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु शेतकऱ्यांनी आस सोडली नव्हती. शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या कर्तव्यदक्ष तथा अनेकांना संकटाच्या वेळी धावून जाणाऱ्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची मजरा लहान येथील आमदार समर्थक कार्यकर्त्यासमवेत शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यांना समोर आपली कैफियत मांडली.

त्यांनी लगेच कंपनी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना संपर्क साधत शेतकरी, प्रशासकीय अधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक लावून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सुचना केली. शेतकऱ्याच्या झालेल्या पीक नुकसानीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणी संपूर्ण लक्ष देऊन सर्वे करण्याच्या अधिकारी वर्गाना सुचना करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

बैठकीत झालेल्या करारानुसार शेतकऱ्यांना चार हप्त्यात नुकसान भरपाई चे पैसे देण्याचे ठरले त्यामुळे जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा पहिला हप्पा देण्यात आला. परंतु पुढील तीन हप्ते मार्च अखेर देण्याचे लेखी ठरले असतानाही कंपनी शेतकऱ्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. परत एकदा शेतकऱ्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेत आपली आपबिती सुनावली. कंपनी ठरलेल्या करारानुसार पैसे देत नसल्याची तक्रार आमदाराकडे करण्यात आली.

त्याच अनुषंगाने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तात्काळ संबंधित शेतकरी व कंपनी अधिकारी ,प्रशासकीय अधिकारी त्यांच्याशी समन्वय साधत उर्वरित तिन्ही हप्पे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करायला लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाचे उधाण आले असून मजरा निमसडा गावातील सर्व शेतकऱ्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.