वरोऱ्यात भर दिवसा युवकाची हत्या  Youth killed in broad daylight in warora

4221

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी) 

वरोरा (दि.20 मे ) :- वरोरा शहरात शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची शनिवारला सकाळी 9 च्या सुमारास विकास नगर येथे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. रितेश रामचंद्र लोहकरे, वय 20 वर्षे ,राहणार विकास नगर हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

शनिवारला सकाळी 9 वा च्या सुमारास त्याच्या एका मित्राने रितेश ला फोन करून त्याच्या घरा नजीकच्या पानठेल्यावर बोलाविले. तिथे काही तरुण आधीच रितेश ची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढविला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

                   घटनेची माहिती मिळताच प्रभारीउपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला.

            पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्यक्षदर्शींनी रितेश ला मारणाऱ्या काही व्यक्तींना बघितलेले आहे. सदर व्यक्तींचा शोध घेणे सुरू असून लवकरच मारेकऱ्यांना अटक करण्यात येईल. सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.