चंद्रपूर जिल्ह्यातील पिक विमा ओरिएंटल कंपनी करत आहे शेतकऱ्यांची थट्टा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.7 ऑक्टोबर) :- खरीप हंगामाची यावर्षी झालेल्या अति पावसामुळे तसेच ऐलो मोजाक रोगाने सोयाबीनचे आणि भाजीपाला. कपाशीचे फार मोठ्या प्रमाणात नुस्कान झालेले आहे . शासनाने यावर्षी एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा उतरवण्यास सांगितले त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेतला .

शेतकऱ्यांनीआपल्या झालेल्या पिकाची नुकसानीची माहिती संबंधित कंपनीला दिली विमा कंपनीने ती उतरवून पण घेतली आणि शेतकऱ्यांना तुमच्या शेतीच्या बांधावर आम्ही दिलेले तालुका प्रतिनिधी एजंट सहा ते सात दिवसात तुमच्या शेतात येऊन सर्वे करतील अशी सूचना शेतकऱ्यांना देण्यात आली आमचा मायाळू शेतकरी कंपनीचा सांगण्यावरून समाधानी झाले परंतु अजून पावितो कंपनीचा कोणीही एजंट वरोरा तालुक्यातील काही गावांत भरपूर अशा शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोचलेच नाही.

येत्या दोन ते चार दिवसात शेतात वाचलेल्या काही पिकांची कापणीला सुरुवात होणार आहे तसेच काही हलक्या प्रतीचे सोयाबीन पीक कापणी झाली आहे सध्या शेतकरी बंधू हे विवेचनेत पडलेले आहे तरीपण संबंधित पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची झालेल्या पिकांचे नुकसानीची पाहणी करून नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अभिजीत पावडे कृषी उत्पन्नबाजार समिती संचालक वरोरा तसेच तालुक्यातील शेतकरी करीत आहे