चंदनखेडा येथे सार्वजनिक वाचनालयचे थाटात उद्घाटन

✒️ मनोज कसारे(वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (4जानेवारी):- ग्राम पंचायत चंदनखेडा येथे सावित्री बाई जयंती व वाचनालयाचे उद्घाटन ,,, भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा ग्राम पंचायत मध्ये क्रांती जोती सावित्रीबाई जयंती चे औचित्य साधून ग्राम पंचाती मार्फत लावण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन आज दिनांक ०३/०१/२०२३ रोजी या गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खुले करण्यात आले .

या वेळी या गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे ग्रामविकास अधिकारी श्री किशोर नाईकवार ग्रामपंचायत सदस्य श्री बंडुजी निखाते सौ मुक्ता सोनुले सौ प्रतिभा दोहतरे सौ सविता गायकवाड श्री नानाजी बगडे श्री निकेश भागवत सौ रंजना हणवते सौ श्वेता भोयर सौ आशा नंनावरे सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीर मुडेवार तंतासमितेचे अध्यक्ष श्री मनोहर हनवते व गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.