शेगाव बू.परिसरातील साथीच्या रोगाचे नियंत्रण करा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव बू. ग्रामीण भागात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. तरी तपासणी अंतिम अनेकांना डेंगू आजारांची लागण झाल्याचे दिसून येत आहे. याकडे आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन साथीच्या रोगावर तात्काळ नियंत्रण आणावे.

सर्वाधिक रुग्ण साथीच्या रोगांनी कंटाळले असून या ताप, हिवताप ,मलेरिया, डेंगू असून लहान मुलावर जास्त परिणाम पाहायला मिळत आहे. प्राण घातक आजाराने त्रास असल्याचे दिसून दिसत आहे , वरोरा तालुक्यातील गाव खेड्यात व शेगाव बु परिसरात आरोग्य विभागाने ग्रामपंचायत स्तरावर मच्छराच्या नियंत्रण साठी उपाययोजना कराव्या.

या वर्षाला सातत्याने पाऊस पडत असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मच्छराचे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या मुळे डेंगू ,ताप, हिवताप ,मलेरिया , साथीच्या रोगा सारख्या मच्छरापासून होणाऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने गावागावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून मच्छर नियंत्रण यंत्रा द्वारे फवारणी करण्याचे आदेश द्यावे व प्रत्येक गावात डेंगू मच्छर नियंत्रण करण्याकरिता लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी व आरोग्य तपासणी औषध उपचार शिबिर घेण्यात यावी डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात यावी.

जेणेकरून ग्रामीण भागातील गोरगरीब गरीब जनतेला याचा लाभ होईल अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना गाव खेड्यात आरोग्य विभागाने करण्यात यावी व कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली शेगाव बु येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्याचे बांधकाम साहित्य अभावी प्रलंबित असल्यामुळे ते सुरू झाले नसून ते जनते साठी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी जेणेकरून ग्रामीण भागातील व शेगाव बु परीसरातील गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल. अशी मागणी – ईश्वर नरड भाजप युवा नेते वरोरा तालुका यांनी केली.