भारत दालमिया सिमेंट कंपनीमध्ये भीषण आगीचे तांडव A massive fire broke out in Bharat Dalmia Cement Company

▫️मनुष्य जीवित हानी नाही मात्र कारखान्याचे अब्ज रुपयाचे नुकसान(No loss of human life but loss of billions of rupees to the factory)

▫️नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे आग लागल्याचे कामगारांचे म्हणणे(Workers say fire started due to mismanagement)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 ऑगस्ट) :- कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कारखान्यातून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर त्यातील नागरिकांना भेडसावत आहे त्यामुळे शेतातील पिके आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे.

कंपनीच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर शिवाय त्यामधून बाहेर पडणारे ज्वलनशील पदार्थ यामुळे एक ना एक दिवस मोठा अपघात घडेल शिवाय बाजूलाच लागून असलेले विद्यालय येथे कंपनीचे अतिरिक्त आंतरिक मार्गाने पडणारे पदार्थ या विषयाला घेऊन पुण्यनगरी वृत्तपत्राने मागील काही दिवसापूर्वी बातमी प्रकाशित केली होती मात्र कंपनी व्यवस्थापनाने याकडे ढुंकूनही पाहिले नाही या अगोदरही सदर कंपनीमध्ये छोट्या मोठ्या आगीचे तांडव लागण्याच्या घटना घडलेल्या आहे याचीच प्रचिती आज सकाळी पहाटेच्या सुमारास दालमिया सिमेंट कंपनीच्या प्रोसेस डिपार्टमेंट अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या क्लींकर बेल्टला अचानक आग लागल्याने सदर कंपनीचे बीसी वन ते फाईव्ह पर्यंतचे संपूर्ण बेल्ट जळून खाक झाले .

ज्यामध्ये कंपनीचे अंदाजे दहा ते पंधरा करोड रुपयाचे नुकसान झाल्याची समजते आगीच्या ज्वाला आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरायला लागल्याचे समजताच अल्ट्राटेक अवार्ड पूर अंबुजा सिमेंट उपरवाही व माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट गडचांदूर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने जीवित हानी टळली रात्र प्रोसेस डिपार्टमेंटच्या गलथान कारबाळामुळेच सदरची आग लागल्याचे अनेक कामगारांचे म्हणणे आहे .

येथे काम करत असलेल्या विविध विभागाच्या आस्थापनेमध्ये सुरक्षिततेचे तीन तेरा वाजल्याचे कळते येथील कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता प्रदान केली जात नसून या अगोदरच अनेक अपघात व अनेकांनी अनेकांना आपल्या जीवाला सुद्धा मुकावे लागलेले आहे पहाटे लागलेल्या आगीमध्ये यदा कदाचित मनुष्य जीवित हानी झाली असती तर त्यास जबाबदार कोण असते असा गंभीर प्रश्न आता कामगारांसमोर निर्माण झाला आहे.

कंपनीचे व्यवस्थापक श्री रायडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते क्षेत्र बाहेर दाखवीत होते शिवाय कोणीही या अपघाताबद्दलची माहिती देण्यास तयार नसल्याचे दिसते सदरचा अपघात झालेल्या वेळेपासून कारखान्याचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाला अब्जो रुपयाचा फटका बसल्याचे समजते.

त्यामुळे कारखान्यामध्ये आता उलट सुलट चर्चेला उदान आले असून सदरच्या अपघाताची राज्य उद्योग धंदे प्रशासनाच्या वतीने कारखान्याची तयार केलेली घटना तपासून जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता कामगारांमध्ये जोर धरत आहे