शेगाव येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार Meritorious students felicitated at Shegaon

313

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 जून) :- नुकताच सगळीकडे बारावी तसेच दहावीचा निकाल लागला असून प्रथम, द्वितीय, तसेच तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून आला.

 दहावी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुमारी राखी कुंदनकर 85% घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर द्वितीय क्रमांक रोहित शर्मा यांनी 83.80% घेऊन प्राप्त केला तृतीय क्रमांक श्रेयांश वैद्य 83.40 % केला आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर सर प्रमुख पाहुणे चांगले सर, मानकर सर, कडुकर सर, झाडे सर, खिरटकर सर यावेळी विद्यार्था व पालक उपस्थित होते

 तसेच वर्ग बारावीतील विद्यार्थी करीना लुकेश वरवडे प्रथम क्रमांक ७९.१७% अयान अल्ताफ शेख द्वितीय क्रमांक ७२.६७%

 स्वाती अनिल गरमडे तृतीय क्रमांक ७२.००. प्राप्त केला आहे यावेळी गुणवंत विद्यार्थांना गिफ्ट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले असून या कार्यक्रमाचे संचालन मानकर सर यांनी केले.