दुचाकीच्या धडकेत एक ठार, ४ जखमी One killed, 4 injured in two-wheeler collision

129

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.8 ऑगस्ट) :- पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरी पासुन १कीमी अंतरावर दुपारी ४ वाजताच्या सुमारास एमएच ३१ सीझेड ५७१७ आणि एमएच ३४ एआर ०७५७ या दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात अजय रमेश कोटांगले (वय ४३रा. विहीरगाव ता,सावली) यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना पाथरी येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात दाखल केले.जखमींची परिस्थिती लक्षात घेता सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विहीरगांव येथील अजय रमेश कोटांगले याला मृत घोषित करण्यात आले मात्र यातील गंभीर जखमी मधील विहीरगांव येथील पद्माकर शालीक नन्नावरे वय ४३,दुस-या मोटारसायकल वरील राकेश गुरुदास मडावी,वय २६,हेमराज वसंत गेडाम,वय २४, यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र यातील कन्नाडगांव येथील विशाल दादाजी मडावी २२ मात्र सुदैवानं बचावला.घटना स्थळाचा पंचनामा करुन पुढील पाथरी तपास पोलीस करीत आहे.