आपल्या न्याय हक्का साठी आदिवासी घोडगाव प्रकल्प कार्यलयासमोर आंदोलन पहील्यांदा पारधी समाजाचा इतिहासात नोंद होईन Pardhi community will be recorded in history when they protest in front of tribal Ghodgaon project office for their right to justice

✒️सुनील भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि .8 ऑगस्ट) :- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 1 लाख 70 हजार आदिवासी पारधी बांधवांची उपासमार होत असून गेली 75 वर्षामध्ये शासनाची कोणत्याही प्रकारची कसलीही मदत पारधी बांधवांना मिळत नाही. सर्व शासकीय कार्यालये, आदिवासी प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद, व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि पंचायत समिती म्हणतात आमच्याकडे आदिवासी पारधी नाही.

असा प्रकार स्वातंत्र्य कालखंडात चिंताजनक आहे. त्यामुळे *ता. घोडेगाव आदिवासी प्रकल्प घोडेगाव येथे दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजता आदिवासी प्रकल्प घोडेगाव कार्यालयासमोर* सर्व आदिवासी पारधी बांधव आदिवासी पोशाखानुसार सामाजिक व्यवस्थेनुसार आपल्या मुळ पेराव्यामध्ये निसर्ग देवी पुजा करण्यात येणार आहे.

” एक गरीब फासे पारधी बांधव घर विना जागा विना, एक गरीब शिक्षणाशिवाय शासकीय सवलती वीना ऊघड्यावर, एक गरीब मृत्युनंतर प्रेत दफन करण्याता जागा विना फटकंती एखाद्या जनावरागत जिन गुजारन करणारा पुणे जिल्हातील 1लाख 70 हजार लोक व पच्छीम महाराष्ट्रातील सहा लाख आदिवासी पारधी आपल्या न्याय हक्का साठी घोडेगाव प्रकल्प कार्यालयासमोर आलो आपल्या दारी”

सर्व मागण्यांसाठी निसर्ग देवी पुजा गुड्या लावून गाण्यांच्या ठेक्यात करण्यात येणार आहे. आदिवासी पारधी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत असे साहित्यिक समाजसेवक नामदेव भोसले यांनी यावेळी सांगितले. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व आदिवासी पारधी असताना सुध्दा याची सरकारी पातळीवर दप्तरी नोंद नसल्याने ती तात्काळ करण्यात यावी.

व शासकिय असणाऱ्या सवलती गोरगरीब आदिवासी बांधवांना मिळाव्यात अश्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी सर्व आदिवासी पारधी बांधवाना एक जिवाने एक मनाणे घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालय पुणे कार्यालय येथे एकत्रित जमणार आहेत. म्हणून सर्वांनी “चला तर एक होऊ, आपला हक्क एक जिवान मागू” असे मत आपल्या आदिवासी बांधवांना समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी हाक दिली आहे…