गोवरी नाल्यात पोहायला गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू Unfortunate death of youth who went swimming in Gowri canal

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 ऑगस्ट) :- राजुरा येतील मुख्यालया पासून १२ किमी अंतरावर असलेल्या गोवरी गावालागत च्या नाल्यात पोहायला गेलेल्या संतोष मनोहर कोडापे या २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो सीटीपीएस मध्ये कामावर होता असे सांगण्यात येत आहे. 

सध्या तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नदी,नाले ओसंडून वाहत आहे.दरम्यान गोवरी गावातील संतोष कोडापे हा २२ वर्षीय युवक गावाला लागून असलेल्या नाल्यात पोहायला गेला.

त्यांनी शिवाजी हायस्कूल जवळील बंधाऱ्यावरून उडी मारली. पण त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व गड्ड्यातील चिखलात फसून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने कोडापे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे.