संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वयं प्रकाशित व्हा ! – रवींद्र शिंदे

🔹वरोरा येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे स्नेहमिलन सोहळा संपन्न

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.20 जानेवारी) :- लोक काय म्हणतील याची कुठलीही तमा न बाळगता सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वयं प्रकाशित व्हा ! असे मत शिवसेनेचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे.विधानसभा प्रमुख शिवसेना, यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले.

ते हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा महिला आघाडीतर्फे स्थानिक बावणे मंगल कार्यालय येथे आयोजित हळदी कुंकू व स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते . 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख चंद्रपूर नर्मदा दत्ता बोरेकर ,प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे , शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्तात्रय बोरेकर , माजी नगरसेविका नगरपरिषद भद्रावती तथा संचालक विविध कार्यकारी सहकारी संस्था, भद्रावती सुषमाताई श्रीनिवास शिंदे, वरोरा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष खेमराज कुरेकार, शिवसेना, महिला उपजिल्हाप्रमुख मायाताई नारळे, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख विद्याताई ठाकरे ,.शिवसेना, महिला उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई घुडे , शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकारी बेबीताई शेंडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाडोळी येथील ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा मांडवकर यांनी केले तर प्रास्ताविक सरला मालोकर यांनी केले

*समाज हितोपयोगी कार्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी ट्रस्ट ची स्थापना -सुषमाताई शिंदे *

“आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून समाज हितोपयोगी कार्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट भद्रावती ची स्थापना केली. या ट्रस्ट मार्फत अनेक समाज हिताचे कार्य पार पाडत असल्याचे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुषमाताई शिंदे यांनी व्यक्त केले”.