वनपरिक्षेत्र (बप्पर) खडसंगी अंतर्गत वृक्ष लागवडीत मोठा भष्टाचार

🔸वृक्ष लागवडीचा भष्टाचार माहीती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष विनोद उमरे यांनी केला उगड

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5 मे) :- सन २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके वन मंत्री विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केले त्या अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लगवड सुरू करण्यात आली.पण वन परिक्षेत्र बप्पर कार्यालय खडसगी अंतर्गत वृक्ष लागवडीत मोठा भष्टाचार असल्याचे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष विनोद उमरे यांनी म्हटले आहे.

माहीतीच्या अधिकारी त्यांनी माहीती मागील असतात त्यांना असमाधानकारक माहिती सादर करण्यात आली.व त्या असमाधानकारक माहिती मध्ये मोठा प्रमाणात भष्टाचार असल्याचे दिसून आले आहे.त्यात मोठा भष्टाचार उगड आणला असून वन परिक्षेत्र बप्पर खडसगी अंतर्गत वन समिती मार्फत वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात कामगारांच्या मंजुरी मध्ये मोठा प्रमाणात भष्टाचार असल्याचे दिसून आले.

आणि वन परिक्षेत्र बप्पर कार्यालय खडसगी अंतर्गत धनदेशष वितरण करण्यात आले त्या धनादेश वर चेक नंबर नाही बिना चेक नंबरचा व बिना तारखेचा चेक वितरित करण्यात आले.त्यामध्ये मोठ-मोठ्या रक्कमा असून मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचे दिसून आले आहे.त्या भष्टाचार करण्याऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वर कार्यवाही साठी पुढील पाहुले उचली जातील असे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष विनोद उमरे यांनी म्हटले आहे.