काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देवू : रविंद्र शिंदे We will give justice to every working Shiv Sainik: Ravindra Shinde

▫️वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध समित्यांवर शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांची निवड(Selection of office bearers of Shiv Sena (Ubatha) on various committees of warora Agricultural Produce Market Committee)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.9 ऑगस्ट) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या राजकारण व समाजकारण करण्याच्या शैलीतून नेहमीच सामान्य शिवसैनिकांना बळ देवून नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. शिवसेनेत अनेक सामान्य घरातील युवक हे राज्याच्या राजकारणात मोठे नेते झाले आहेत.हा इतिहास आहे.

शिवसेना (उबाठा) हा असा पक्ष आहे की जिथे अनेक सामान्य कुटुंबातील युवा पुढे नेते व जनप्रतीनिधी बनतात. त्याच प्रमाणे वरोरा व भद्रावती विधानसभा क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देवू व जनसेवेकरीता जनप्रतिनिधी बनवू असे वक्तव्य रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काल (दि.८) ला विविध समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे चार पदाधिकारी हे विविध समित्यांचे सभापती पदावर विराजमान झाले आहेत.

याप्रसंगी शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे बोलत होते.

शिवसेना (उबाठा) वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांची कृ.उ.बा.समितीच्या बांधकाम समिती सभापती पदी निवड झाली, शेगाव–बोर्डा क्षेत्रातील उपतालुका प्रमुख अभिजित पावडे यांची कृ.उ.बा. समितीमधे प्रतवारी समितीच्या सभापती पदावर निवड झाली, टेमुर्डा-चिकणी क्षेत्रातील उपतालुका प्रमुख विलास झिले यांची कृ.उ.बा. समितीमधे अनुज्ञाप्ती समिती सभापती पदावर निवड झाली.

तर माढेळी-नागरी जिल्हा परिषद क्षेत्रातील महिला आघाडी उपतालुका संघटीका कल्पना टोंगे यांची कृ.उ.बा. समितीच्या अनुज्ञाप्ती समिती, बांधकाम समिती, नियमन समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.