सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य उद्योग पुरस्कार २०२४ मध्ये आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.6 मे) :- दिनांक ५ मे २०२४ ला महाराष्ट्र राज्य उद्योग रत्न पुरस्कार आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री विदिशा म्हसकर यांच्याकडून गौरविण्यात आले.या भरगच्च कार्यक्रमात एकुन ८५ व्यक्तींना पुरस्कारीत करण्यात आले.

त्यामध्ये सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनाही सन्मानित करण्यात आले.वंदना यांनी आपल्या आरोग्यावर व जिवंन शैलीवर प्रकाश टाकला.आपल आरोग्य कस जपायच त्याचा प्रचार व प्रसार केला आणि अवयव दान नेत्र दान देह दान रक्त दान करण्याचें आव्हान केले.आणि कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांचें आभार मानले.