स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई

✒️संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.6 मे) :- पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दि. 05.05.2024 रोजी गोपनिय बातमीदारा कडुन पो.स्टे. घुग्घूस परीसरातील ग्रेस शाळेच्या मागे खर्रा व्यावसायिकाने त्याचे घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू ची अवैधरित्या साठवणुक करुन विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घूस येथिल खर्रा व्यावसायिक शाहीर हनिफ शेख वय 33 वर्षे रा. घुग्घुस यांस ताब्यात घेवून त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी कि.अं. 95,076 रु. चा वेगवेळ्या कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाखु मिळुन आला. सदरचा गुन्हा पो.स्टे. घुग्घूस येथे नोंद करुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पो.स्टे. घुग्घूस यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि एकरे सा. पोहवा स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.