भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन संचालक मंडळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी दिला रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वाला कौल In the elections held for the new Board of Directors of Bhadravati Agricultural Produce Market Committee, the voters voted for the leadership of Ravindra Shinde

🔹शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलची सरशी(Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Head of Varora-Bhadravati Legislative Assembly Chief and social activist Ravindra Shinde is the head of the Shiv Sena Farmers Cooperative Panel)

🔸रवींद्र शिंदे गटाचे १२ तर धानोरकर गटाचे ६ उमेदवार विजयी(12 candidates of Rabindra Shinde group and 6 candidates of Dhanorkar group won)

🔹चंद्रपूर जिल्ह्यातील एकमात्र बाजार समितीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा; उध्दव बाळासाहेब ठाकरे तथा संजय राऊत यांनी घेतली दखल(Flag of Uddhav Balasaheb Thackeray group on sole market committee of Chandrapur district; Uddhav Balasaheb Thackeray and Sanjay Raut took notice)

 

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.1 मे) : –

           स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक काल दि. ३० एप्रिल रोजी पार पडली. तालुक्यातील जि. प. शाळा, भद्रावती, जि. प. शाळा, नंदोरी, जि. प. शाळा, चंदनखेडा, येथील एकूण आठ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या सर्व मतदान केंद्रावर तब्बल १७ जागांसाठी ११७२ मतदार पैकी ११२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रियेत एकूण ९६% मतदान झाले आहे.

रवि शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचा ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून शिवसेना (ठाकरे) गटातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचे मोहन व्यंकटी भुक्या हा उमेदवार आधीच अविरोध निवडून आलेला होता. तर मतदानानंतर आलेल्या निकालात सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून ताजने भास्कर लटारी (३०४), डुकरे ज्ञानेश्वर राजाराम(२९१), आगलावे मनोहर शत्रुघ्न(२८९), घुगल विनोद बापुराव(२८६), जांभूळकर शरद महादेव(२८४), तिखट भास्कर लटारी(२८४), उताणे गजानन दीनाजी(२८२), सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून आश्लेषा शरद जीवतोडे(२९८), शांताबाई लटारी रासेकर(२८१), सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटातून ताजने परमेश्वर सदाशिव(२८६), सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून शामदेव गणबाजी कापटे(२८८) असे एकूण १२ उमेदवार निवडून आलेले आहेत.

काँग्रेस पक्षाचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पैनलचे ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून राजेंद्र गजानन डोंगे(११९), प्रवीण संबाशिव बांदुरकर(११८), ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून अतुल विठ्ठल जीवतोडे(७७), अडते व व्यापारी गटातून भानुदास वासुदेव गायकवाड(६४), अनिल भानुदास चौधरी(६५), तथा हमाल व मापारी गटातून राजू पुरुषोत्तम आसुटकर(१२) असे एकूण ६ उमेदवार निवडून आले.

या बाजार समितीच्या निवडणूकीच्या रणसंग्रामात महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना पैनल विरोधात काँग्रेस कडून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पैनल यांच्यात लढत होती. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलने बाजी मारली आहे व रवींद्र शिंदे यांच्या गटाला मिळालेल्या बहुमतामुळे त्यांची सरशी झाली आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीचा (दि.२९) ला आलेल्या निकालानुसार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे, यांच्या शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलच्या बाजूने मतदारांनी कौल दिला होता. तर भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या (दि.३०) ला झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत मतदारांनी वरोऱ्याच्या निकालाची पुनरावृत्ती करत रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वाकडे भक्कम कौल दिल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एकमात्र बाजार समितीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे तथा संजय राऊत यांनी या निकालाची दखल घेतली असून रवींद्र शिंदे सोबत परिसरातील पदाधिकारी तथा शिवसैनिक यांचे अभिनंदन केले आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, भद्रावती नागरी सहकारी पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक तथा गुरुजी फाऊन्डेशचे अध्यक्ष प्रशांत कारेकर, अखील भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा पानवडाळा ग्रा.पं. सरपंच प्रदिप महाकुलकर, मुधोली ग्रा.पं. सरपंच बंडू पा. नन्नावरे, नंदोरी ग्रा.पं. उपसरपंच मंगेश भोयर, मुरसा ग्रा.पं. उपसरंपच सुनिल मोरे, भद्रावती कृ. उ. बा.स. च्या माजी उपसभापती अश्लेषा जीवतोडे-भोयर, शांता रासेकर, डॉ. नब्बू दाते, संजय तोगट्टीवार, युवराज इंगळे, यांच्यासह तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते या सर्वांचा या यशात सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी एस.एच. संधू, वरोरा यांनी काम बघितले. नायब तहसीलदार मलिक पठाण, पोलीस सहायक निरीक्षक सुधीर वर्मा यांचे नेतृत्वात पी एस.आय. किटे यांनी काम पाहिले.