शिवजयंती निमित्याने शेतकरी कर्जमाफी करिता मनसेचा बैलबंडी मोर्चा Bullock cart March of mns waiving farmers’ loans on the occasion of shiv jayanti 

353

🔸छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशात शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा निघणार असल्याने यात सामील होण्याचे मनसेचे शेतकऱ्यांना आवाहन

✒️ परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.5 मार्च) :- राज्यात भाजप शिवसेना या देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना सन २०१७ मधे राबवली तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुत्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सन २०२० मधे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना राबवली होती, खरं तर या दोन्ही योजना महापुरुषांच्या नांवावर राबविण्यात आल्यानंतर दोन्ही योजनेत पात्र असणाऱ्या वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही व प्रोत्साहन राशी सुद्धा मिळाली नाही त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मनसेद्वारे शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

यासाठी वरोरा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन पण करण्यात आले पण तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यामुळे येणाऱ्या १० मार्चला शिवजयंती च्या निमित्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात शेतकऱ्यांचा भव्य बैलबंडी मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. या मोर्चाला मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसेचे मुंबई येथील महाराष्ट्र सैनिक सुधीर खापने यांची उपस्थित राहणार आहे. 

मनसेच्या या बैलबंडी मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान केलेल्या शेतकऱ्यांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कारण ज्या महापुरुषांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली ती कर्जमाफी फसवी निघाली आणि हजारो शेतकरी या महापुरुषांच्या नावाने झालेल्या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे हा महापुरुषांचा एक प्रकारे अपमान आहे आणि म्हणूनच सरकारला जाग येण्यासाठी बैलबंडी मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान केलेल्या शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 10/03/2023 रोज शुक्रवार ला सकाळी 11 वा डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथून ते तहसील कार्यालय वरोरा असा बैलबंडी मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयासमोर दिवसभर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गोर गरीब शेतकरी ज्यांना सरकारी कर्जमाफी अनुदानापासून अजूनही वंचित ठेवल्या जात आहे. नियमित बैंकचे कर्ज भरणा करूनही अजून त्यांना कोणतीही अनुदानित रक्कम मिळालेली नाही.

त्यामुळे मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनात या ज्वलंत प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी व आपल्या हक्काच्या मागणीसाठी तरुण तडफदार तसेच अबाल, वृद्ध, जेष्ठ शेतकरी बंधू तसेच परिस्थिती मुळे ज्या महिलांना सुद्धा शेतीत दोन हात करावे लागत आहे. अशा व शेतकरी हितासाठी धडपडणाऱ्या सर्व महिला भगिनींनी सुद्धा या मोर्च्यात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी मोर्चात सामील होण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात जवळपास १५०० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर जवळपास २००० शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून ५० हजार रुपये मिळाले नाही शिवाय अतिवृष्टीचे पैसे सुद्धा शेकडो शेतकऱ्यांना मिळाले नाही.

यामध्ये तलाठी तहसीलदार यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्था व बैंक व्यवस्थापण जबाबदार आहे आणि सरकार याबाबत कुठलेही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही पर्यायाने ज्या शेतकऱ्यांना पात्र यादीत नाव असताना कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांची बैंक खाती गोठवण्याची कारवाई बैंक व्यवस्थापनाने सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता भदुजी गिरसावळे, रमेश मंत्री इत्यादी शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांपासून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण यश आले नाही, त्यामुळे वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शिवजयंतीच्या निमित्याने बैलबंडी मोर्चात सामील व्हावे असे आवाहन मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, संदीप मोरे, प्रशांत बदकी. श्रीकांत तळवेकर, गजू वादाफळे. मोहित हिवरकर, पंकज पेटकर, पवन ढोके, जयंत चौधरी, विनोद खडसंग.

राजेंद्र धाबेकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर, मनोज गाठले, दिलीप दोहतळे, उत्तम चिंचोलकर, रंगनाथ पवार, प्रतीक मुडे, दिलीप उमाटे, धनराज बाटबरवे, मनोहर खिरटकर, शंकर क्षीरसागर, शंकर कोडापे, विठ्ठल पडाल, सुनील घोसरे. मंगेश कोल्हे, घोटेकर विठ्ठल लेडांगे. पारखी बंडू आपटे अमित चिंचोलकर, अशोक दाते आशिष बावणे, महेंद्र गारघाटे. गोपाल चौधरी. प्रमोद हनवते.शुभम नरड, संदीप घुबडे अतुल गावंडे इत्यादींनी केले आहे.