रमेश राजूरकर यांना मनसेनं तारलं तर भाजपने घेरलं Ramesh rajurkar was fielded by mns while bjp fielded him

🔸पण इकडे वरोरा विधानसभा क्षेत्रात वादळ उठलय 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर(दि.6 मार्च) :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात निवडणुकी लढणाऱ्या उमेदवारांची संख्या अनगिनत आहे, मात्र यामध्ये मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रमेश राजूरकर यांच्याकडे लोकं भावी आमदार म्हणून पाहू लागले होते, त्याचे कारण हे होते की मनसेच्या गावागावांत शाखा बांधणी सुरू होत्या व त्या शाखा उद्घाटनाला रमेश राजूरकर आवर्जून हजर राहायचे व तेच येणाऱ्या सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे प्रमुख दावेदार म्हणून समोर आले असल्याचे चित्र स्पष्ट होते.

दरम्यान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात वेळोवेळी स्थानिक प्रशासनाला देण्यात येणारे निवेदन असो की विविध जनसमस्या संदर्भात आंदोलन असो, रमेश राजूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहायची, त्यामुळे मनसेचा उमेदवार रमेश राजूरकर असे समीकरण जुळल्याने लोकांना रमेश राजूरकर म्हणजे मनसेचा भावी आमदार असे वाटायचे, पण इकडे रमेश राजूरकर हे मात्र पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन वेगळ्याच प्लॅनमधे होते

 त्यांना मनसे पेक्षा भाजप पक्षात आपण उमेदवार म्हणून निवडून येण्याची आशा वाटतं होती त्यामुळे भाजप च्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या गुप्त बैठका होतं होत्या व त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट घालून दिल्या गेल्याची चर्चा होती. त्यामुळं “रमेश राजूरकर यांना मनसेनं तारलं तर भाजपने घेरलं” अशी परिस्थिती दिसत असून वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजप मनसेत राजकीय वादळ उठल अशी परिस्थिती दिसत आहे. 

रमेश राजूरकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी प्रहार पक्ष, भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन विराट मोर्च्याचे आयोजन केले होते पण तो विराट मोर्चा पूर्णता फेल ठरला व राजूरकर यांच्या लोकप्रियतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

मात्र स्थानिक वर्तमानपत्रात त्याचं मोर्चाला हजारोंच्या संखेचे अर्थपूर्ण वळण देऊन भव्य मोर्चा झाल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की तहसील कार्यालयापर्यंत आलेल्या मोर्चात १०० शेतकरी सुद्धा शिल्लक राहिले नव्हते त्यामुळे राजूरकर यांच्या विराट मोर्चाचे तीनतेरा वाजले होते हे स्पष्ट आहे.  

रमेश राजूरकर यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हार झाली असेल तर त्यामध्ये महत्वाचा घटक होता तो म्हणजे मनसेची गावस्थरावर संघटन बांधणी नव्हती, त्यामुळे येणाऱ्या सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचाच उमेदवार निवडून आणायचा असा संकल्प घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गांव तिथे पक्षाची शाखा हे अभियान राबवून वरोरा तालुक्यात ५० टक्के गावांत शाखा बांधणी केली.

महत्वाची बाब म्हणजे त्या शाखा उद्घाटनाला रमेश राजूरकर हे प्रमुख म्हणून समोर असायचे व शाखा फलकांवर त्यांचे मनसे नेते म्हणून नाव असायचे, त्यामुळे गावागावात रमेश राजूरकर यांचा जनसंपर्क मनसेच्या शाखांच्या माध्यमातून होतं होता. पण आता त्यांचा मोर्चा भाजप कडे वळला आणि राजूरकर यांच्या संदर्भात राजकीय तर्कवितर्क सुरू झाले.

नुकतिच एका वर्तमानपत्रात “मनसेचे रमेश राजूरकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्या” अशी बातमी प्रकाशित केल्याने रमेश राजूरकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असला तरी त्यांचं आत्ता टेंशन वाढलं आहे. कारण भाजप मधे जे देवतळे घराणं आहे व डॉ अनिल बुजोने सारखे जेष्ठ नेते आहेत त्यांचा स्वाभिमान जागा झाल्याने ते रमेश राजूरकर यांच्या भाजप प्रवेशाला किती स्वीकारतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे, अर्थात त्यामुळे आता रमेश राजूरकरांची राजकीय कोंडी झाल्याचे बोलल्या जातं आहे. 

रमेश राजूरकर यांना भाजपमधे का जावंसं वाटतंय?

मागील सन २०१९ च्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार रमेश राजूरकर हे ताकतीने लढले होते व त्यांनी काँग्रेस उमेदवराला आवाहन दिले होते की माझी उमेदवारी मागे होणार नाही, माझे स्वतःचे वार्षिक ४५० कोटींचे व्यवहार आहे. मीच समोरच्या उमेदवाराला उमेदवारी परत घेण्यासाठी पैसे देऊ शकतो. दरम्यान त्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मते मिळाली व पहिल्याच निवडणुकीत ३५ हजार मतदारांनी कौल दिल्याने राजूरकर यांची छाती मोठी झाली.

आता येणाऱ्या सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपण लढू व जिंकू या उद्देशाने त्यांनी स्वतः गावागावात जावून भेटी घेण्याचे सत्र सुरू केले व मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाच्या शाखा उद्घाटन व विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू ठेवला पण मनसेत राहून आपण निवडून येऊ शकत नाही हा साक्षातकार बहुदा त्यांना झाला असावा कारण मनसे कडून निवडणूक काळात पैसे मिळत नाही तर भाजप कडून चिकार पैसे मिळतील व त्या पैशातून आपण प्रतिस्पर्धी धनदांडग्यां काँग्रेस उमेदवारावर मात करू अशी त्यांनी खुणगाठ बांधली असावी अशी शक्यात आहे आणि म्हणूनच त्यांना भाजप सर्व बाबीतीत सोयीस्कर वाटत असल्याचे दिसत आहे. 

तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी परिस्थिती ओढावणार?

भारतीय जनता पक्षात वरोरा विधानसभा क्षेत्रात स्वर्गिय संजय देवतळे यांच्या पत्नी व मुलगा करण देवतळे व जेष्ठ नेते डॉ अनिल बुजोने असतांना रमेश राजूरकर यांना कुठल्या निकषांवर भाजप उमेदवारी देईल ? हे न उमगलेले कोडे असून भाजपच्या संस्कृतीत शब्द वैगेरे काहीही नसतं फक्त काम करत राहणं हे महत्वाचं असून वेळेनुसार संधी दिल्या जाते यांचं भान कदाचित रमेश राजूरकर यांना नसावं .

आणि म्हणूनच त्यांचा भाजप प्रवेश जर विधानसभा उमेदवारी मिळविण्यासाठी असेल तर त्यांचा तो आत्मघातकी निर्णय ठरू शकतो एवढं मात्र नक्की.त्यामुळं राजूरकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे “तेलही गेलं आणि तुपही गेलं हाती धुपाटनं आलं” अशी परिस्थिती होणार असल्याचे चित्र दिसत आहे.