उद्या ठरणार ग्रामपंचायत उमेदवारांचे भविष्य

44

🔹शेगाव पोलीस बंदोबस्तात पार पडली ग्रामपंचायत निवडणूक

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 नोव्हेंबर) :- सन 2023 मध्ये कार्यकाळ झालेल्या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत आज ग्रामपंचायत निवडणुक मतदार यशस्वीरित्या पार पडले असून यामध्ये शेगाव पोलीस बंदोबस्तात निवडणूक घेण्यात आली..

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम ही 7 सदस्य असलेले ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत सालोरी येथे 9 सदस्य ग्रामपंचायत असून दोन्ही ग्रामपंचायत ठिकाणी आरक्षण सोडत सरपंच पदासाठी जनतेमधून महिला उमेदवार निवडून देणे होते.

 ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण स्त्री,, प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री, याप्रमाणे असणार असून सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती स्त्री चे आरक्षण सोडण्यात आलेली आहे, ग्रामपंचायत सालोरी येथे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती याप्रमाणे असून सरपंच पदाकरिता सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण सोडण्यात आले,

निवडणूक मतदान करताना यामध्ये अपंग, ज्येष्ठ महिला,पुरुष नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करत ग्रामपंचायत निवडणूक पार पडले तसेच याकरीता पोलीस प्रशासन शेगाव तर्फे मोठ्या प्रमाणात निवडणूक यशस्वीरित्या पाडण्यासाठी चौक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता..

ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे 73.50 % मतदान झाले असून यामध्ये 821 मतदारांनी मतदान केले आहे. तसेच सालोरी येथे 1685 मतदारांनी मतदान केले असून 85% मतदान झाले आहे..