पिक विमा पासून एक ही शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाही

✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.19 जानेवारी) :- यावर्षी अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

       करिता वरोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला परंतु येथील शेतकरी पीक विमा योजना पासून वंचित असून अजून पर्यंत अनेक शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही .

त्यामुळे सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांवरील पिक विमा पासून मिळणारी मुस्कान भरपाई यापासून एकही शेतकरी बंधूंना वंचित राहू देणार नाही असे मत श्री अभिजीत पावडे आदिवासी कार्यकारी सोसायटी चारगाव बू चे उपसभापती यांनी व्यक्त केले . 

यावर्षी झालेल्या अति पावसामुळे वरोरा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे पिकांचे नुस्कान उत्पन्नात घट झाल्याचे कृषी विभाग. पिक विमा कंपनी एचडीएफसी यांच्या निदर्शनास येऊन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात दिसून येत आहे तरी संबंधित एचडीएफसी पिक विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे अजून पावे तू शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली नाही .

वरोरा तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित पिक विमा कंपनी कार्यालयावर धडक देऊन कंपनीला जाग येत नसेल तर एचडीएफसी पिक विमा कंपनीवर फसवणुकीचा दावा तालुक्यातील शेतकऱ्याकडून न्यायालयात दाद मागण्याची तयारी करू अशी वार्तालाप वरोरा तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे.