गळफास घेऊन लाईनमनची आत्महत्या

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव कार्यालय mecb येथील चारगाव विभाग अंतर्गत कमलेश नामदेव मुंडरे वय 36 लाईनमन पदावर असुन पंखॉला लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे..

शेगाव येथील यशोदा नगरीत भाड्याने राहत असलेल्या दडमल यांच्या घरी चारगाव विभाग बुद्रुक अंतर्गत लाईन पदावर असलेले कमलेश मुंडरे वय 36 चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील रहीवाशी असुन पत्नी आपल्या दोन मुलासह शेगाव येथे राहत होते.

मुंडरे यांना मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन असून दुपारच्या सुमारास पंखीला लटकत पत्नीला दिसतात शेजारील नागरिकांच्या साहाय्याने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करीता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले याची अधिक माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असुन अधिक तपास ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल कवरासे करीत आहे….