भद्रावती पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड Bhadravati police raid gambling den

76

▫️तीन लाख 12 हजार900 रुपयाच्या मुद्देमाल घेतला ताब्यात(Three lakh 12 thousand 900 rupees seized)

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.30 ऑगस्ट) :- मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी बरांज तांडा जंगल परिसरात केली.सदर जंगल परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाड मारली असता तेथे पाच व्यक्ती जुगार खेळतांना आढळले.

या कारवाईत चार मोटरसायकल व नगदी 30,000 रकमेसह एकूण तीन लाख 12 हजार900 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात शशांक बदामवार , अनुप आष्टणकर , विश्वनाथ चुदरी , निकेश ढेंगे जगदीश झाडे आदींनी केली.