14 वर्षीय मुलीचा विनयभंग  करणाऱ्या आरोपीला अटक 14-year-old girl molested The accused arrested

73

✒️मनोज कासारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .3 सप्टेंबर) :- तालुक्यातील एका गावात एक 14 वर्षी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून तिचा विनयभंग एका सदतीस वर्षे इसमाने केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराच्या तक्रारीनंतर आरोपी महेश तुराणकर, वय 37 वर्ष राहणार ओंकार लेआउट, भद्रावती याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.

सदर आरोपीची त्या गावात पाळीव जनावर असल्यामुळे तो नेहमी त्या गावात जात येत होता. त्यामुळे तो गावातील सर्वांच्या परिचित होता. घटनेच्या दिवशी सदर आरोपी त्या गावात गेला. सदर मुलगी हि घरात एकटी होती, ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला.

घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आल्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीवर संबंधित गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल किटे करीत आहे.

https://smitdigitalmedia.com/