मालेवाडा सूगतकुटी येथे होणार 25 फूट डॉ. बाबासाहेब व तथागतांची मूर्ती Malewada sugatkuti will be 25 feet statue of Dr.babasaheb and tathagata

281

दिवाकर निकुरे समाजिक कार्यकर्ता सूगतकुटी येथे भूमीपूजन

Divakar nikure social activist bhoomipujan at sugatkuti

✒️प्रमोद राऊत (खडसंगी प्रतिनिधी)

खडसंगी(दि.4मार्च) :-चिमूर नागपूर महामार्गावर जांभूळघाट जवळ असलेल्या मालेवाडा सूगतकुटी येथे उद्या दि. 5 मार्च 2023 ला तथागत भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या नियोजित जागेचे भूमीपूजन सोहळा माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे कांग्रेसचे युवानेते दिवाकर निकुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या हस्ते आज 10 वाजताच्या दरम्यान भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.

       आम्रवन दीक्षाभूमी सूगतकुटी यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या नियोजित जागेचे आज भूमिपूजन सोहळा होणार असून, कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उधघाट्क म्हणून माजी कॉबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार हॆ उपस्थित राहणार आहेत. सह उधघाट्क काँग्रेसचे युवानेते चिमूर विधानसभा क्षेत्र व सामजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर बौद्ध धर्मगुरू भन्ते पूर्णांक बोधी नागपूर इत्यादी मान्यवर भूमिपूजन सोहळा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 

       भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर लगेच कामाला सुरवात होणार असून, या आम्रवन दीक्षाभूमी सूगतकुटीच्या जागेवर तब्बल 25 फूट उंच अशी भव्यदिव्य तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती यापरिसरात लवकरच निर्माणाधीन होणार आहे. सदर कार्यक्रमाला लाखो रुपये खर्च होणार असून वैयक्तिकरित्या दान स्वरूपात मूर्ती याठिकाणी देण्यात येणार आहेत.

कार्यक्रम नागपूर येथील बौद्ध धर्मगुरू भन्ते पूर्णांक बोधी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेमधून उपस्थित पत्रकारांना देण्यात आली. पत्रकार परिषदेला चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस युवानेते दिवाकर निकुरे व गौतम पाटील उपस्थित होते. 

      कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गजाननभाऊ बुटके माजी जि. प. सदस्य, धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (OBC) कमिटी, प्रफुलभाऊ खापर्डे माजी सभापती प. स. नागभिड, संजय डोंगरे, विजय गावंडे तालुका अध्यक्ष काँग्रेस चिमूर, अॅड. घुटके नागभिड, राम राऊत प्राध्यापक, संजय घुटके, भिमराव ठावरी, खोजराज मरस्कोल्हे माजी जि. प. सदस्य चंद्रपूर, विनोद बोरकर, पुरुषोत्तम बगमारे, पारस नागरे, नितीन कटारे, बंडूभाऊ गेडाम मनसे तालूका अध्यक्ष नागभिड, प्रमोद चौधरी तालूका अध्यक्ष काँग्रेस नागभिड, राजुभाऊ लोणारे, रत्नाकर विठाडे, जावा भाई, राजु दांडेकर, गौतम पाटील, ओम खैरे, डॉ. रेहमान पठाण, कल्पना इंदुरकर माजी नगरसेवक, रिता अंबादे, नाजमा पठाण इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत.

 कार्यक्रमाचे आयोजक आम्रवन दीक्षाभूमी सूगतकुटी भिक्खू संघ संस्था मालेवाडा हॆ असून, यावेळी समाजिक युवानेता दिवाकर निकुरे व बौध्द धर्मगुरू भन्ते पूर्णांक बोधी यांचा विशेष सत्कार मालेवाडा येथील आयोजक मंडळीच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमधून देण्यात आली.