पिपरबोडीच्या युवकांनी दिले अजगराला जीवनदान

62

✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि.8 जानेवारी) : – नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील गौतम नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून महामार्ग पार करीत असताना ८ फूट लांबीच्या अजगराला जवळपास ४ जड वाहतूक करणाऱ्या वाहनातून पिपरबोडी व गौतमनगरच्या युवकांनी त्या अजगराला वाचविले. जर का युवक धावून गेले नसते तर अजगराचा चेंदा मेंदा झाल्याशिवाय राहिला नसता.ही घटना दि .८ डिसेंबरच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.अजगर हा अंदाजे साडे ४ वर्षाचा असून ८ फूट लांबीचा असल्याची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे यांनी दिली.

      पिपरबोडी येथील श्रीनिवास कॉलनीडी,बाबू चेट्टी,आदी कॉलनिडी,प्रतीक कावळे व सतीश पिडगु या युवकांनी अजगराला पकडुन वनविभाग कार्यालयात आणून सदर अजगराची नोंद केली.व त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जंगलात निर्जनस्थळी नेऊन निसर्ग मुक्त केले.