वाघाच्या हल्ल्यात वृध्द इसम ठार

66

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 जानेवारी) :- बल्लारपूर वन परीक्षेत्र अंतर्गत कारवा नियत कक्ष क्रमांंक एक मधील ४९२ मध्ये सरपण गोळा करण्यासाठी इसमावर वाघाने हल्ला केला.या हल्ल्यात तो ठार झाला.ही घटना रविवारी दुपारी १.30 वाजता उघडकीस आली.यात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव शामराव रामचंद्र तिडसूरवार रा.बल्लारपूर असे आहे. वन विभागाने मृतक शामराव यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपयाची तातडीची मदत केल्याची माहिती बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.

बल्लारपूर वन परीक्षेत्र अंतर्गत कारवा जंगलाचा भाग आहे. जंगल परिसरात अनेकदा वन्य प्राण्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. अशातच आज रविवारी सरपण गोळा करण्यासाठी शामराव तिरसुडवार गेले होते.

दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने झाडप घालून शामरावला जागीच ठार केले.या घटनेची माहिती बल्लारपूर वन विभागाला देण्यात आली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शामराव तिरसुडवार याचे शव उत्तरीय तपासणी साठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

या घटनेचा अधिक तपास मध्य चांदा वन विभाग चंद्रपूरच्या श्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे.