शेतकर्याना एक हात मदतीचा A helping hand to farmers

▫️ग्रामीण भागात शेतकर्यानच्या मदतीला कृषिदुताचे आगमन(Arrival of agricultural ambassador to help farmers in rural areas)

✒️मनोहर खिरटकर खांबाडा(Khambada प्रतिनिधि)

खांबाडा(दि.5 ऑगस्ट) :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सधन व्हावा याकरिता नवनवीन आधुनिक व प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती द्वारा संचलित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येवती, ता. वरोरा येथे महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाले.

यावेळी गावाचे सरपंच पवन पिसदूरकर, प्रगत शेतकरी मिथुन ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी या कृषीदुतांचे स्वागत केले, यावेळी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती व त्यातून होणाऱ्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीविषयक पुरेसे व योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. बी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. पंचभाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये हितेश महाजन, वैभव वाघ, अभय काटकर, अभय गवळी, रजनीकांत गुगल आणि प्रज्वल बुरांडे या कृषीदुतांचा समावेश आहे.