सातत्यपूर्ण अभ्यासाने यश शक्य- ठाणेदार अविनाश मेश्राम

314

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )

वरोरा (१८ डिसेंबर):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो.अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून बोध घेऊन योग्य नियोजन करून सातत्याने अभ्यास करा.यश नक्की येणार अस प्रतिपादन ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केलं.ते नेचर फाउंडेशनच्या चिमूर शाखेद्वारे आयोजीत विविध शासकीय सेवेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात केलं.

  या वेळी अध्यक्ष स्थानी प्रवीण भीमटे,प्रमुख अतिथी म्हणून निलेश नन्नावरे,आशिष जीवतोडे,नितेश खोब्रागडे उपस्थित होते.पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन केला.नवीन शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी आवाहन केलं की तुम्हाला समाजच देणं आहे याचं भान ठेवून सार्वजनिक क्षेत्रात कार्य करा.प्रवीण भीमटे यांनी नेचर फाउंडेशन चे कार्य,संकल्पना या बाबतीत माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून झाली.

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झालेले राहुल जांभुळे, वर्षा शेडामे,निकिता टेम्भुरकर केंद्रीय राखीव दलात निवड झालेले आकाश दोहतरे,पंकज श्रीरामे,गौरव चौखे,दीपक वर्मा,प्रशांत बन्सोड, बंटी उरखडे,स्वप्नील खडसंग, मुकेश कींनाके,विशाल गीते,राकेश दडमल,अंकित भरशनकर,प्रफुल चौखे,अक्षय बोरकर,नंदू अन्नावार, पोस्ट विभागांत निवड झालेल्या रीना वांढरे,रुपेश सोनटक्के, आशिष चौधरी यांना संविधानाची प्रत व एक रोपटं देऊन सत्कार करण्यात आला.अनेकांनी आपले अनुभव तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक नेचर फाउंडेशन चे सचिव निलेश नन्नावरे यांनी केलं तर संचालन प्रा.अमर ठवरे तर आभार आशिष जीवतोडे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर फाउंडेशन चे मंगेश सहारे,निखिल मोडक, प्रज्ञा खोब्रागडे, स्नेहा फटींग, काजल सावसाकडे इत्यादींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थी व त्यांच्या पालकांची उपस्थिती होती.