शेगाव बू तसेच वरोरा तालुक्यात थ्री फेज सुरळीत सुरू होणार …श्री ईश्वर नरड यांच्या मागणीला यश

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 नोव्हेंबर) :- शेगाव बु सर्कल तसेच वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना थ्री फेज विज पुरवठा शेती साठी दिवसात नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला होता.कपाशीचे पीक त्याचप्रमाणे धान पिके उन्हामुळे सुखायला सुरुवात झाली होती .रब्बी हंगामातील चना ,गहू यासारख्या पिकांना ओलीत करण्यास सुरुवात झाली.

त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा नसल्यामुळे जंगली जनावरांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना होत होता मा सुधीर भाऊ मुनगंटीवार पालक मंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्याकडे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी ईश्वर नरड यांनी सातत्याने लावून धरली त्यांच्या मागणीला यश मिळत मा.सुधीर भाऊ यांनी त्यांच्या आदेशाने विद्युत वितरण कंपनीने दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू केल्यामुळे त्यांचे आभार मानले ईश्वर नरड (विद्युत वितरण नियंत्रण समिती अशासकीय सदस्य कृषी ग्राहक). नवीन कृषी सुधारित विद्युत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे

ग्रुप 1)११केव्ही दादापुर आणि मेसा फिडर

मंगळवार ते शुक्रवार-

दुपारी १२.००ते सायंकाळी ८.०० वाजे पर्यंत

शनिवार ते सोमवार- सकाळी.५.००ते दुपारी १.००वाजे पर्यंत..

ग्रुप 2) ११केव्ही चारगाव आणि वडगाव फिडर

शनिवार ते सोमवार

दुपारी १२.००ते सायंकाळी ८.००पर्यंत

मंगळवार ते शुक्रवार

सकाळी ५.००ते दुपारी १.००पर्यंत..