एडवोकेट गोविंदा राठोड यांची कायदा सल्लागार पदी निवड Advocate Govinda Rathod appointed as Legal Adviser

✒️ सुनील ज्ञानदेव भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.16 ऑगस्ट) :- कंजारभाट समाज विकास कृती समिती द्वारा आयोजित समाज सशक्तीकरण व प्रबोधन मेळावा शनिवार दिनांक 12/08/2023 रोजी हॉटेल शांती कमल,शिर्डी देवस्थान जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पार पडला.

या मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्याचे कंजारभाट या विमुक्त भटक्या समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते एडवोकेट गोविंदा अर्जुन राठोड यांची कंजारभाट समाज विकास कृती समिती चे मुख्य सल्लागार श्री मुरचंद भाट(नोटरी भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाने व समिती पदाधिकारी यांच्या निर्णयाने महाराष्ट्र प्रदेश कायदा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी एडवोकेट गोविंदा राठोड यांना या नियुक्ती चे नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

कंजारभाट या विमुक्त भटक्या समाजावर होणारे अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढ़ा देणार असल्याचे या वेळी एडवोकेट गोविंदा अर्जुन राठोड यांनी सांगितले.