मा.श्री .संजय आडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर  State Level samaj Bhushan Award to Honorable Mr.Sanjay Ade

🔸मराठी सिनेअभिनेत्री अल्का कुबल यांच्या हस्ते प्रदान करणार (Presented by Marathi cine actress Alka Kunal)

✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.1 मार्च) :-माळपठारावरील नावलौकिक युवा नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, हिवळणी (तलाव) गावाचे पुत्र, आमचे मामाश्री *सामाजिक कार्यकर्ता तथा अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे यवतमाळ कार्याध्यक्ष मा.संजय मदन आडे* यांनी मेहनत नेहमी फळाला येते पुन्हा सिद्ध करून दाखवले. तुम्ही सामाजिक क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या गेलेल्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी *”महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार”* मिळवला.

अतिशय सामान्य परिस्थितीत राहून देखील असामान्य कार्य करणाऱ्या समाजाच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी झटनारे आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे *मा.संजय मदन आडे* यांना पुन्हा एकदा बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी *”राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार”* नुकतेच जाहीर झाले. स्वतःच्या सीमित परिघाबाहेर बाहेर पडून संजय मामांनी सामाजिक योगदानाचा मापदंड उंचावला आहे.

सरपंच सेवा संघाने यांच्या कर्तृत्वाची घेतलेली नोंद खरंच प्रशंसनीय आहे. *मा. संजय मदन आडे* यांना *”राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार”* सरपंच सेवा संघाचे संस्थापक. बाबासाहेब पावसे आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.

*माननीय.संजय मदन आडे आपले निस्वार्थ सेवा कार्य जनसामान्यांना दीपस्तंभासारखे ठरावे हीच सदिच्छा..! आपल्या कार्याला कर्तुत्वाला आदरपूर्वक सन्मान..!*