गुजगव्हान रस्त्याचे डांबरीकरण करा …प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 नोव्हेंबर) :- चिमूर तालुक्यातील गुजगव्हान ते चिमूर -वरोरा राष्ट्रीय महामार्ग पर्यंत १ कि.मि.रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे.

त्यामुळे या रस्त्याने ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यी,शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्यावरील गिट्टी उसळलेली आहे.त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहे.जाणाऱ्या-येणाऱ्या शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे.तरी या रस्त्यांचे दुरवस्था लक्षात घेत.

प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी १कि.मी.रस्त्याचे गुजगाव्हान ते चिमूर -वरोरा राष्ट्रीय महामार्ग पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.अशी मागणी विनोद उमरे व त्यांचे सहयोगी सामाजिक कार्यकर्ते जिथू रामटेके,ऋषी धारणे,ईश्वर गेडाम यांनी केली आहे.