राष्ट्रवादी नेते ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे व पदाधिकाऱ्यांनी केला रवींद्र शिंदे यांचा जाहीर सत्कार

✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

 वाघेडा (दि.3 जानेवारी):- शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमूख पदी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल आज (दिनांक ३) ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे व वरोरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष जयंत टेमुर्डे, तालुका अध्यक्ष विशाल पारखी, लक्ष्मण ठेंगणे, राजू वरघने, बंडू भोंगळे, प्रदीप सहारे, माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा दत्ता बोरेकर, प्रा. धनराज आस्वले, विनोद मालू , खेमराज कुरेकार तथा विविध मान्यवर उपस्थित होते.

        रविंद्र शिंदे यांच्या नियुक्ती मुळे परिसरात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भावी काळात वरोरा विधानसभेला एक सामाजिक कार्याचे वलय असलेला नेता प्राप्त झालेला आहे. सध्या परिसरातील जनता विविध समस्यांनी ग्रस्त आहे.

सिंचन, रोजगार, आरोग्य, शिक्षण, पाणी, शहरी व ग्रामीण भागातील भौतिक सुविधा, नैसर्गिक आपत्तीपासून नागरीकांचे रक्षण, वन्यप्राण्यांपासून संरक्षण, विविध उद्योगांद्वारे होणारा त्रास, आदी अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर रवि शिंदे हा आशेचा चेहरा असल्याचे जाणकारांचे मत आहे.

        पुढील वाटचाली करीता सर्वांनी रवींद्र शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.