स्वातंत्र्यदिनी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरतर्फे दिव्यांग बांधवास तीन चाकी सायकल भेट On Independence Day, Sambhaji Brigade Ballarpur gifted a three-wheeler bicycle to disabled people

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.15 ऑगस्ट) :- संभाजी ब्रिगेड शाखा बल्लारपूर ही नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या आणी जबाबदार उपक्रमासाठी ओळखली जाते. यंदा भारत देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२३ रोजी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरतर्फे येथील श्रीराम वार्ड स्मशानभूमी परिसरातील रहिवासी असलेला दिव्यांग बांधव प्रथम सुनील सागवणे याला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. यामुळे प्रथमला या स्वातंत्र्यदिनी एक नवीन स्वातंत्र्य मिळाल्याचे भाव चेहऱ्यावर उमटले.

              समाजातील गरजूंची गरज समजून त्यांच्याप्रती आपली जबाबदारी ओळखून ती पूर्ण करण्याचे चांगले कार्य केल्याने संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहरातील संभाजी ब्रिगेडचे निखिल वडस्कर,रोहित चुटे,आमिर अहेमद,संकेत चौधरी,गणेश मसराम,साहिल घिवे,अंकुश पिंपळकर,प्रज्वल गौरकार,प्रतिक वाटेकर,मोहित अदमाने,संदीप सहारे,प्रनिल नवघरे प्रणयदादा वाटेकर आदी उपस्थित होते.