उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक रजोनिवृत्ती दिन कार्यक्रम 

48

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.20 ऑक्टोबर) :- दिनांक १९ आॅक्टोबर २०२३ ला जागतिक रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.हा कार्यक्रम महिनाभर वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांतून घेता येतो.नवरात्रीचे दिवस चालू आहे.नवरात्र हे शक्तीचे प्रतीक आहे.त्याच शक्तीचा आदर्श घेऊन नवरात्रोत्सवचे औचित्य साधून हा रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम खास महिलांसाठी जनजागृतीपर प्रचार व प्रसार करण्याचे उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.

  हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाला डॉ सुषमा लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ,सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका,,सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ, सौ डॉ वर्षा भुसे फिजिओथेरपिस्ट,सौ नेहा ईंदुरकर समुपदेशक उपस्थित होत्या या सर्व तज्ञ महिलांनी आपआपल्या क्षेत्रातील विषयांवर मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम स्त्रियांनी स्त्रियांसाठी आयोजित केला होता.रजोनिवृत्ती दिनाचा संदर्भात मार्गदर्शन करुन प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

डाॅ लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी रजोनिवृत्तीचि माहिती, लक्षणें, उपाय, विषयी मार्गदर्शन केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी रजोनिवृत्ती मध्ये कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग आणि सासू सुनेतील संबंध यांचे महत्त्व समजावून सांगितले त्याचा परिणाम चांगला कसा होतो आणि जीवन कस खूशयाली सुखदायी होतों याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले

   सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले.कोण कोणता आहार घ्यायला पाहिजे.काय खबरदारी घ्यायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले.

   डॉ वर्षा भुसे फिजिओथेरपिस्ट यांनी रजोनिवृत्ती मध्ये कोणकोण व्यायाम, प्राणायाम करायला पाहिजे.याविषयी सविस्तर माहिती दिली.

     सौ नेहा ईंदुरकर समुपदेशक यांनी रजोनिवृत्ती मध्ये आपले मानसिक स्वास्थ्य कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन केले.

     सूत्रसंचालन स्नेहा रामटेके यांनी केले प्रास्ताविक स्वाती जूणारकर व आभारप्रदर्शन सौ सोनाली राईसपायले यांनी केले.

या कार्यक्रमाला श्रीमती सरस्वति कापटे परिसेविका,कु.जोशीला गेडाम यांनी सहकार्य केले.

 स्री शक्तीला सलाम करूंन तिसर्या ईनींगचे स्वागत करून पाॅझीटीव्ह विचार शैली आत्मसात करून पुढील आरोग्यदायी जीवनाची सकारात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.