चंदनखेडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन 

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.20 ऑक्टोबर) :- कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मौजा चंदनखेडा येथे भद्रावती तालुक्यातील एकमेव प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमाला मा.आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर भद्रावती वरोरा विधानसभा चंदनखेडा गावाचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ भारती उरकांडे , सुधीर मुळेवार सा.का. तसेच मा. विलास नरवटे उपजिल्हाधिकारी.

मा. अनिकेत सोनवणे तहसीलदार, मा. अशितोस सपकाळ गटविकास अधिकारी, मा. सवसाकडे साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच कौशल्य विकास चे अधिकारी उपस्थित होते.