चारगाव धरणाला आला महापूर  Flood came to Chargaon Dam

▫️हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली(thousands of hectares of agricultural land under water)

▫️शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान(loss of lakhs to farmers)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 ऑगस्ट) :- चंद्रपूर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेले चारगाव मध्यम प्रकल्प चारगाव धरणाला महापूर आल्याने नदी लगत असलेल्या पुराचे पाणी अनेक शेतामध्ये शिरले असल्याने या पाण्यामुळे अनेक पिकाची नासधूस झाली असून काही पिके रोपट्यासह वाहून गेलीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून येथील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

      करिता चारगाव बू , चारगाव खुर्द , अर्जुनी , धानोली , कोकवाडा, व अन्य गावातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी श्री अभिजीत पावडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच आदिवासी कार्यकारी सोसायटी चारगाव बू चे उपसभापती यांनी केली आहे …

                सविस्तर असे की काल शनिवार च्या रात्रौ पासून या परिसरात जोरदार मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी साचले असून छोट्या मोठ्या नाल्यातून पाणी सैरवैर धावत असून धरणात जात आहे त्यामुळे या वर्षी सर्वाधिक चारगाव धरणाला महापूर आला असून पुराच्या पाण्याने रूद्र आवतर घेतला असल्याचे महा भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. 

          हे पुराचे पाणी नदीलगत असलेल्या अनेक शेतामध्ये पाणी शिरले असून अनेक पिके पाण्याखाली असून तासनतास होऊन देखील पुराचे पाणी कमी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढत आहे . 

         विशेष म्हणजे पुराच्या पाण्यामुळे हाती आलेले शेतपिके नष्ट होण्याच्या मार्गात असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे तेव्हा जिल्हाधिकारी महोदय तसेच तहसीलदार वरोरा यांनी तात्काळ या परिसराची पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अभिजीत पावडे यांच्यासह अनेक शेतकरी करू लागले आहेत.