चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळ अपघात  Accident near chandankheda fork near bhadravati on chandrapur – nagpur highway 

🔸वरोरा येथील दोन युवक ठार 

✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.14 एप्रिल) :- चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची खबर आली आहे.

दोघेही वरोरा शहरातील रहिवासी असून एकाचा जागेवर मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंचभाई व अंकुश सुनील भडगरे वय 23 राहणार वरोरा याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हे दोघेही मुले भद्रावतीला जात असताना हा अपघात घडला. पुढील तपास भद्रावती पोलीस करित आहे.