जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात डोळे तपासणी मोहीम राबवावी Eye examination campaign should be conducted in every hospital of the district

83

▫️सैनिक समाज पार्टीची आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली(Sainik Samaj Party demanded from the health administration)

✒️गडचिरोली(Gadchiroli विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

गडचिरोली(दि .29 ऑगस्ट) :- जिल्ह्यात डोळ्याची साथ असुन डॉक्टरां अभावी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्रात तसेच उपजिल्हा रुग्णालयात डोळ्याच्या तपासणीची मोहीम राबवण्यात यावी व नेत्ररोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         डोळे येणाऱ्या साथीचे आजार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तसेच संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत डोळे येत आहे .व ग्रामीण भागात रुग्णांवर योग्य ते उपचार सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेत्र रोग तज्ञ नसल्याने होत नाही. त्यामुळे या रुग्णांना तेथील आरोग्य व ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील रुग्णालयात पेशंट रेफर करतात .

काहीजण उपचारासाठी येतात तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. रुग्णांना दिलासा मिळावा आणि आजाराबाबत जनजागृती व्हावी याकरिता सर्वप्रथम आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपजिल्हा रुग्णालयाने डोळे तपासणी मोहीम गावागावात राबविण्यात यावी, तसेच तालुक्यातील रुग्णालयात रुग्णांना रेफर न करता तेथेच त्यांची तपासणी करण्यात यावी तसेच तज्ञ नेत्र रोगतज्ञांची नेमणूक करावी .

रुग्णांना त्रास होणार नाही , त्यांच्यावर योग्य उपचार होतील या उदात्त हेतूने मोहीम सुरू करावी. अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम जिल्हा महासचिव प्रकाशसिंग बंडवाल गडचिरोली विधानसभा प्रमुख हंसराज उराडे , महिला जिल्हाध्यक्ष रुपाली कावळे, तालुका नियोजन समिती अध्यक्ष निलकंठ सिडाम, विजय सेडमाके यांनी केली आहे.