वरोरा येथे कॅरीयर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न Career guidance workshop concluded at warora

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.16 ऑगस्ट) :- जिवक वाचनालय वरोरा येथे , उच्च शिक्षण व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न: प्रमुख मार्गदर्शक प्रा. अनुप कुमार सर नालंदा अकॅडमी वर्धा, यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासंदर्भात उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.

विद्यार्थी केवळ NEET ,JEE कडेच न वळता कला, कायदा, इ. क्षेत्रात देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये, (JNU, TISS, IFLU, APU)तसेच परदेशामध्ये सुद्धा उच्च शिक्षणाच्या संधी आहेत, परंतु केवळ योग्य माहिती नसल्यामुळे विद्यार्थी त्याकडे वळत नाही ,याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार अविनाश मेश्राम सर पोलीस स्टेशन शेगाव ,उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना मानवतावादी विचारांवर चालण्याचा संदेश दिला.. नुकतीच PSI झालेली तनुजा खोब्रागडे रा.गिरोला तह. वरोरा या मुलीचा सत्कार करण्यात आला. नागलोक बहुउद्देशीय संस्था वरोरा तर्फे सामाजिक जाण म्हणून कु. नम्रता गायकवाड रा. खेमजई ता. वरोरा या मुलीला 12 वीच्या शिक्षणासाठी 40 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. आयु संजय नळे सर यांचेकडून जिवक वाचनालयास तथागत गौतम बुद्ध यांची पेंटिंग भेट देण्यात आली.

सदर पेंटिंग ही कु . सावली मुन या मुलीने काढली असून, तिचा देखील सत्कार प्रा. अनुप कुमार सर यांच्यातर्फे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. आनंदराव वानखेडे सर हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. निखील ठमके यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. चक्रधर साठे सर यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिवक वाचनालय परिसरातील लोकांचे आर्थिक तसेच सामाजिक असे मोलाचे सहकार्य लाभले.