पांढरतळा येथे ‘गाजरगवत जागरुकता सप्ताह’ द्वारा जनजागृती  Public awareness through ‘Gajargavat awareness week ‘at Pandratala

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.29 ऑगस्ट) :- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महारोगी सेवा समिती द्वारा संचालित, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्नित वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पांढरतळा येथे ‘गाजरगवत जागरुकता सप्ताह’ चे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच श्री.शंकरराव दडमल व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 

               गाजरगवत म्हणजे समस्त शेतकऱ्यांसाठी प्रचंड समस्या असलेले तण आहे. गाजरगवताची वाढ आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गाजरगवत निर्मूलनासाठी सामूहिकरीत्या गाव पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी 16 ते 22 ऑगस्ट या काळात ‘गाजरगवत जागरुकता सप्ताह’ आयोजित केला जातो.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शेतक-यांना गाजरगवतामुळे होणारे दुष्परिणाम, त्यावर नियंत्रण करण्याच्या पद्धती व मेक्सिकन भुंगाचा गाजरगवत निर्मूलनासाठी वापर पटवून दिला. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी.महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.आर. इमडे व विषय विशेषज्ञ डॉ. वि. वि. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

            या कार्यक्रमात निरज आभारे, तुषार बुरले, नकुल बकाल, शरद गुरले, रोहन मांजरे, व श्याम इरतकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.